प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रशासक डॉ.. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी सादर केलेल्या महापालिकेच्या 2021-2022 च्या आपले बजेटमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. जादा पाणी वापरणाऱयांच्या पाणीपट्टीत वाढ करण्यात आली असली तरी घरफाळा, परवाना, आरोग्य आदी सेवांसह इतर सेवांशुल्कात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. नवीन विकासकामे, योजनांसह पंचगंगा प्रदूषणमुक्ती, कोटीतिर्थ तलाव संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद केली. त्याचबरोबर बंद पडलेला कोल्हापूर महोत्सव सुरू करण्याचे नियोजन बजेटमध्ये करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सभागृहाची मुदत गेल्या वर्षी 15 नोहेंबरला 2020 रोजी संपल्यानंतर प्रशासक डॉ.. बलकवडे यांच्याकडे महापालिका प्रशासनाची सर्व सूत्रे आहेत. लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नसल्याने महापालिका प्रांतिक अधिनियम कायद्यातील तरतुदीनुसार डॉ.. बलकवडे यांनी प्रशासक म्हणून बजेटला मंजुरी दिली. त्यानंतर ते सादर करण्यात आले. बजेट तयार करण्याआधी शहरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील तज्ञ, मान्यवरांसह विविध संस्था, संघटनांकडून सूचना, अपेक्षा जाणून घेतल्या होत्या. त्याचे प्रतिबिंब बजेटमध्ये पडल्याचे योजना आणि तरतुदीवरून दिसते. महसुली, भांडवली, विशेष प्रकल्प, वित्त आयोग निधी मिळून 1085 कोटी 48 लाख रूपयांचे बजेट आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहताना सोयी, सुविधा देताना आवश्यक असणाऱया वैद्यकीय उपकरणे, सहित्यासाठी जवळपास दोन कोटी रूपयांच्या स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. झोपडपट्टीत फिरते दवाखाने, आरोग्य सुविधांच्या दर्जात वाढ, सावित्रीबाई फुले, पंचगंगा हाŸस्पिटलसह आयसोलेशन हाŸस्पिटल, शहरातील 11 नागरी आरोग्य सुविधा केंद्रात वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. महापालिकेच्या कर्मचाऱयांना हेल्थकार्ड देण्यात येणार आहे.
जादा पाणी वापरणाऱयांना भरावे लागणार जादा पाणीबिल
केवळ पाणीपट्टीत वाढ केली असली तरी जादा, अतिरिक्त पाणी वापर करणाऱयांना जादा पाणीबिल भरावे लागणार आहे. घरगुती वापराच्या पाण्यासाठी वीसहजार लिटरसाठी कोणतेही वाढ नाही. मात्र त्यापुढील टफ्फ्यात वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर बिगर घरगुती आणि औद्योगिक वापराच्या पाणीपट्टीतही काही प्रमाणात वाढ केली आहे. जीवन प्राधिकरणामार्फत ग्रामीण भागात पुरविल्या जाणाऱया पाण्यावरील पाणीबिलापेक्षा कोल्हापूर महापालिकेची पाणीपट्टी कमी आहे, असा दावा प्रशासक डॉ.. बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
Previous Articleआरक्षणाची 50 टक्के मर्यादा हटवा; महाराष्ट्र सरकारच्या मागणीला बळ
Next Article निकिता तोमर हत्या; दोघे आरोपी दोषी
Related Posts
Add A Comment