वार्ताहर / किने
काजूच्या झाडांना टाकलेल्या युरिया बकऱ्यानी खाल्याने पाच बकऱ्यांचा मृत्यु झाल्याची घटना वाटंगी येथे घडली. यात दोन पालवे व तीन शेळ्या होत्या. यामुळे शेतकरी गणपती नाईक यांचे अंदाजे 50 हजारांचे नुकसान झाले.
वाटंगी येथील शेतकरी गणपती नाईक यांनी खडक नावाच्या शेतात बकरी चरावयास सोडली होती. परिसरातील काही शेतकऱ्यांनी काजूच्या झाडांना युरिया खत टाकले होते. बकऱ्यानी हे युरिया खत खाल्ले. यामुळे अर्ध्या तासात सर्व बकऱ्या जागीच कोसळल्या. ग्राम पंचायत सदस्य बाळू पोवार व मधूकर जाधव यांनी पशू वैद्यकीय डॉ. भोई यांना बोलवून उपचार केले. पण उपचारापूर्वीच सर्व बकऱ्यांचा मृत्यू झाला.
पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी काजूच्या झाडांना खाते घालतात. पण अशी खत उघड्यावर न टाकता मतीआड करणे गरजेचे आहे. गेल्यावर्षी सुद्धा वाटंगी येथील दत्तात्रय कांबळे यांच्या बकऱ्या मृत झाल्या होत्या. यामुळे अशा वारंवार घटना टाळण्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी खते घालतांना काळजी घेणे गरजेचे आहे.
Previous Articleजलसमाधी घेणारा आंदोलकच गायब झाल्याने प्रशासनाची उडाली भंबेरी
Related Posts
Add A Comment