वार्ताहर / गोकुळ शिरगाव
राज्यात प्रथमच गोकुळ शिरगाव येथील गोरे इंडियन गॅस ग्रामीण वितरक कडून 425 किलो सिलेंडरचे लॉन्चिंग व वितरण करण्यात आले.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत वसाहतीमध्ये राजेंद्र गोरे यांच्या गोरे इंडियन गॅस मधून राज्यात प्रथमच 425 किलोच्या सिलेंडर गॅस चे लॉन्चिंग व उद्घाटन चिप एरिया मॅनेजर पुणे विभागाचे राजेश भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर सेल्स मॅनेजर संकेत जाधव उपस्थित होते.
गोरे इंडियन गॅस गोकुळ शिरगाव मध्ये गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहे. इंडस्ट्री साठी लागणारे कमर्शियल गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात याठिकाणी वितरित होत आहेत .आज जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रथमच इंडियन गॅस ग्रामीण वितरक यांचेकडून 425 किलोचे सिलेंडर राज्यात प्रथमच येत असल्याने गोरे इंडियन गॅस कडून याचे आज लॉन्चिंग करण्यात आले या लॉन्चिंग प्रसंगी जिल्ह्यातील सर्व इंडियन गॅस वितरक उपस्थित होते.
Previous Articleआता वाहन क्षेत्रात जीएसटी कपातीची आवश्यकता नाही
Next Article तुर्की-उजबेकिस्तानच्या रिझर्व्ह बँकांनी विकले सोने
Related Posts
Add A Comment