कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर शहरात आज तीन नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. सायंकाळी चारच्या सुमारास मुक्तसैनिक वसाहत आणि फुलेवाडी रोड परिसरात रुग्ण आढळले. मुक्तसैनिक वसाहतीत ५५ वर्षीय पुरुष आणि ५० वर्षीय महिला दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली आहे. तर तामजाई कॉलनी, फुलेवाडी रोड ३४ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, शहरातील मुक्तसैनिक वसाहत परिसरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर परिसर सील करण्यात आला असून कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.
Previous Articleसोलापूर ग्रामीण मध्ये आज 31 कोरोनाबाधितांची भर
Next Article राफेलची पहिली तुकडी 27 जुलैला भारतात दाखल होणार
Related Posts
Add A Comment