प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ तालुक्यांसह काही भागाला विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले. आज रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले असून झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
काही भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.