प्रतिनिधी/शाहुवाडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील सोळा गावात सुरू ठेवलेला कंटेन्मेंट झोन अखेर मागे घेण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांनी यासंबंधी आदेश दिले आहेत. मात्र पुढील कालावधीत घ्यावयाची खबरदारी व आवश्यक सुचना देण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मलकापूर नगर परिषदेत उद्या, सोमवारी दुपारी बारा वाजता बैठक होऊन पुढील सूचना दिल्या जाणार आहेत.
तालुक्यातील उचत येथे कोरोनाचे तीन कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे प्रशासनाने उचत सह सोळा गावात प्रशासनाने कंटेन्मेंट झोन घोषित केला होता. मात्र सध्या उचत मधील हे तीन रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने उचत, माण, परळे, येलुर पैकी जाधववाडी, पेरीड, कोपार्डे, शाहूवाडी, चनवाड, शिरगाव, करंजोशी, ओकोली, मलकापूर, येळाणे, कापशी, कडवे, कोळगाव, टेकोली आदी गावातील प्रशासनाने कंटेन्मेंट झोन उठवला आहे.
Previous Articleसांगली : अहमदाबादवरून साळशिंगेत आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह
Next Article धक्कादायक : रत्नागिरीत कोरोनाचा दुसरा बळी
Related Posts
Add A Comment