राजेंद्र होळकर / कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर ता. करवीर येथील राजश्री शाहु छत्रपती विद्यानिकेतनला कबड्डी व कुस्तीचे खराब मॅट पुरवठा करुन, सरकारच्या १५ कोटी ९९ हजार ९९९ रुपयावर डल्ला मारल्याच्या बहुचर्चीत प्रकरणी अखेर शाहुपूरी पोलिसांत दोघाविरोधी गुन्हा दाखल झाला. त्यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल झाल्याच्यांमध्ये कोल्हापूरातील सनराईज इव्हेंट अँण्ड एक्सीबिशन या फर्मचे प्रमुख अलोक यादव आणि योग्य गुणवत्तेप्रमाणे साहित्य नसतानाही पुरविलेले साहित्य योग्य असल्याबाबतचा चुकीचा अहवाल दिल्याप्रकरणी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्याचा समावेश आहे. पोलिसांनी या दोघाचा शोध सुरु केला असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
शिंगणापूर { ता. करवीर } येथील राजश्री शाहु छत्रपती विद्यानिकेतनमध्ये कबुड्डी व कुस्तीच्या मॅटची गरज निर्माण झाली होती. याबाबत जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सभागृहात मागणी केली होती. याची दखल घेवून जिल्हा परिषदेने निविदा काढली. त्यानुसार ही निविदा कोल्हापूर येथील सनराईज इव्हेंट अँण्ड एक्सीबिशन या फर्मचे प्रमुख अलोक यादव यांनी भरली. छाननीअंती या विद्यानिकेतला कबुड्डी व कुस्तीचे मॅट पुरवठादार करण्याचे काम देण्यात आले. त्यांनी निविदाप्रमाणे कबड्डी व कुस्तीचे मॅट पुरवठा न करता खराब मॅटचा पुरवठा केला. या मॅटबाबत शंका आल्याने जिल्हा परिषदेने या मॅट गुणवत्तेप्रमाणे पुरविल्या आहे की नाही. यांची चौकशी करुन योग्य अहवाल पाठविण्याविषयी कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्याच्याकडे साहित्य पाठविले.
प्राचार्यांनी पुरवठादाराने पुरवठा केलेले मॅट योग्य गुणवत्तेप्रमाणे नसतानाही मॅट योग्य गुणवत्तेप्रमाणे पुरवठा केल्याबाबतचा चुकीचा अहवाल जिल्हा परिषदेला दिला. हा अहवाल योग्य समजून जिल्हा परिषदेने पुरवठादार अलोक यादवला १५ कोटी ९९ हजार ९९९ रुपये मॅट खरेदोचे दिले.
त्यानंतर काही दिवसाने पुरवठादाराने राजश्री शाहु छत्रपती विद्यानिकेतनला कबड्डी व कुस्तीचे खराब मॅट पुरवून सरकारचे १५ कोटी ९९ हजार ९९९ रुपये लाटल्याचे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणावरुन जिल्हा परिषदेमध्ये गेल्या काही महिन्यापासून भरेच चर्चेचे रान उठले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये याबाबत चर्चा होऊन संबंधित पुरवठादार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या चर्चेअंती जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचेही मत घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचा अभिप्राय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिला.
यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी जयश्री जाधव यांनी मॅट खरेदीबाबतच्या निविदेवेळी केलेला करारप्रमाणे पुरवठादार सनराईज इव्हेंट अँण्ड एक्सीबिशन या फर्मचे अलोक यादव यांनी जिल्हा परिषदेला मॅटचे साहित्य न देता खराब साहित्याचा पुरवठा करुन, सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारल्याप्रकरणी केलेला करार आणि अन्य कागदपत्रांसह संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र शाहूपुरी पोलिसांना १९ ऑगष्टला दिले. या पत्राची पोलिसांनी तब्बल पंधरा दिवस चौकशी करुन,सनराईज इव्हेंट अँण्ड एक्सीबिशन या फर्मचे प्रमुख यादव व कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्या विरोधी गुन्हा दाखल केला.
Trending
- रस्ते कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करा; मनसेचे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन
- कोल्हापूरच्या फुटबॉलमधून परदेशी खेळाडूंचे पॅकअप !
- Ratnagiri : बांधकाम मंत्र्यांच्या दौऱ्यादिवशी महामार्गावर अपघात, महिला जखमी
- मुंबई- गोवा महामार्गाची एक लेन डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल- मंत्री रवींद्र चव्हाण
- तू स्माईल अँबेसिडर झालास…पण त्यांचं हसू हिरावून घेतलंय; क्लाईड क्रास्टो यांचा सचिनसाठी संदेश
- शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांना अडवू नये
- 25 हजाराची लाच घेताना पारगांव ग्रामीण रुग्णालयाचा कर्मचारी मुलास ताब्यात; सहायक अधीक्षकांवरही गुन्हा दाखल
- भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची निवड