प्रतिनिधी/शिरोळ
आपण यापूर्वीही स्केटिंग असो वा.. स्केटिंग करत अनेक गाड्याच्या खालून जावून रेकॉर्ड केलेले ऐकलं असेलच. पण शिरोळमधील अवघ्या तीन वर्षीय बालिकेने एक नव रेकॉर्ड आपल्या नावे केलयं. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील कु स्वरा नामदेव निर्मळेने एका मिनिटांमध्ये 38 वेळा नाकाला जीभ लावून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड रेकॉर्ड केले आहे, यासंदर्भातील अधिकृत रेकॉर्ड नोंद होऊन रेकॉर्ड नोंदीचे सन्मानपत्र व बक्षीस नुकतेच तिला मिळाले आहे.
टाकळीवाडीची बालिका स्वरा ही अंगणवाडी शाळेत जात असून, तिच्या वय वर्ष तीन वर्षे तीन महिने 28 दिवस आहे. मिनिटांमध्ये 38 वेळा नाकाला जिभ लावून तिचे रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करिता 10 जून 2020 रोजी करण्यात आले होते, त्याची अधिकृत नोंद होऊन नुकतेच तिला सन्मानपत्र व बक्षीस मिळाले,
स्वरा हिला वडील पुंडलिक निर्मळे, आई मंगल निर्मळे यांचे मार्गदर्शन तसेच गावातील सर्व तरुण मंडळ , माजी सैनिक व गावकरी यांचे या कामी तिला सहकार्य व प्रोत्साहन लाभले. पालक नामदेव निर्मळे म्हणाले, वंशाला दिवा मुलगाच पाहिजे असा काहीजण हट्ट करतात,पण शौर्या व स्वरा या दोन्ही मुलीनी नाकाला जिभ लावून मुली कुठे कमी नाहीत हे दाखवून दिले आहे, हे पाहून समाजाची दृष्टी व चित्र बदलेल, मुलीने रेकॉर्ड नोंद केल्यामुळे गावचे, जिल्ह्याचे नाव चांगल्या पद्धतीने कोरले जात आहे. याबद्दल अनेकांनी माझ्या मुलांचे कौतुक केले, पण मुली नको म्हणणाऱ्यांना ही एक चपराक बसली असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.