पाटगाव / वार्ताहर
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्वीजयासाठी जातांना पाटगाव येथील मौनी महाराजांचा आशिर्वाद घेऊन पुढे मार्गस्थ झाले होते. या मोहिमेत त्यांना प्रचंड यश मिळाले होते. अशा ऐतिहासीक दक्षिण दिग्वीजय मोहिमेची माहिती राज्यभर पोहचिवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केले. ते पाटगाव ( ता. भुदरगड )येथे दक्षिण दिग्वीजय यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.
ते पुढे बोलतांना म्हणाले, दक्षिण दिग्वीजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटगाव येथे येऊन स्वहस्ते मौनी महाराजांच्या मंदिराची पायाभरणी केली. वेदोक्त प्रकरणानंतर जगातील सर्व क्षत्रीयांचे गुरूस्थान निर्माण करण्याची प्रेरणा राजर्षी शाहू महराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्वीजयामुळे मिळाली. पाटगावला शिव-शाहूंच्या विचाराचा मोठा ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. पाटगाव हे सामाजीक क्रांतीचे केंद्र असुन या परिसराचे ऐतिहासीक महत्व विचारात घेता पाटगावचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी दक्षिण दिग्वीजय यात्रेचा शुभारंभ खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आला.
सचीन भांदीगरे यांनी आपल्या प्रास्ताविकात क्षात्र जगदगुरु पिठाच्या इतिहासाची माहिती देऊन राजर्षी शाहू महाराजांनी पिठास दिलेली सनद वाचन करून पिठाच्या शिष्य परंपरेची ओळख करून दिली. तसेच युवकांनी इतिहासाच्या संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, युवक नेते डॉ. नवज्योत देसाई, प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे, भुदरगड सायकलीष्टचे अध्यक्ष सुशांत माळवी, सरपंच संदेश भोपळे, प्रकाश वास्कर, भुदरगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे, रोहित इंदूलकर, प्रकाश वास्कर, संग्राम पोफळे, शशिकांत पाटील, सुशांत मगदुम, रोहित तांबेकर, स्वरूप पिळणकर, अमोल पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन सागर पाटील यांनी केले तर आभार विश्वनाथ कुंभार यांनी मानले.
फोटो : पाटगाव येथे दक्षिण दिग्वीजय यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना खासदार छत्रपती संभाजीराजे, विश्वनाथ कुंभार, नवजोत देसाई, दयानंद भोईटे, सचीन भांदीगरे, मच्छिंद्र मुगडे आदी.
Previous Articleअखेर कणबर्गीत झाली पिण्याच्या पाण्याची सोय
Next Article पारंपरिक आकाश कंदिलांना वाढती मागणी
Related Posts
Add A Comment