बेंगळूर : सरकारी हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजमधील कोविड लॅबमध्ये कंत्राटी तत्वावर सेवा बजावणाऱया कर्मचाऱयांनाही विशेष भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये कोविड लॅबमध्ये एकूण 922 कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱयांना वैद्यकीय शिक्षण खात्याने भत्ता देण्याची घोषणा बुधवारी केली आहे. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी यासंबंधी ट्विट करून माहिती दिली आहे. संशोधक, साहाय्यक संशोधक, लॅब तंत्रज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर यांना 5 हजार रुपये, नर्सेसना 8 हजार रुपये आणि ड श्रेणी कर्मचाऱयांना 10 हजार रुपयांचा विशेष भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Previous Articleम्हैसूर महापौरपदासाठी 11 जून रोजी निवडणूक
Next Article सर्व जिल्हय़ांमध्ये शनिवारपर्यंत यलो अलर्ट
Related Posts
Add A Comment