क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथे लीलावती पॅलेस चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट कोचिंग संघाने फर्स्ट क्रिकेट अकादमी संघाचा 56 धावाने पराभव केला. 39 धावा व 3 गडी बाद करणाऱया अष्टपैलू आदीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या या सामन्यात क्रिकेट कोचिंग इन्स्टिटय़ूट संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 8 बाद 180 धावा केल्या. त्यात राजदीप एम.ने 1 षटकार 4 चौकारासह नाबाद 40, आदीने 5 चौकारासह 49, तर शुभम केने 3 चौकारासह 28 धावा केल्या. फर्स्ट क्रिकेट अकादमीतर्फे सागर कम्मारने 35 धावात 2 तर श्रेयांस, रेहान, सुजल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल फर्स्ट क्रिकेट अकादमी संघाचा डाव 26 षटकात 124 धावात आटोपला. त्यात सुजय बीकेने 1 षटकार 5 चौकारासह 60 तर आकाश केने 2 चौकारासह 14 धावा केल्या. क्रिकेट कोचिंगतर्फे आदिने 25 धावात 3 तर कलशने 22 धावात 2 गडी बाद केले.