प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील पर्यावरणप्रेमींतर्फे शुक्रवारी पणजी येथील प्रसिध्द इम्यॅक्यूलेट कॉन्सेपशन चर्चजवळ क्लायमेट स्ट्रायक्सच्या माध्यमातून अनेक गोव्याच्या हीताविरुध्द असलेल्या विषयांचा निषेध केला. यामध्ये प्रामुख्याने मोले अभयारण्य क्षेत्रात येणारे प्रकल्प, शेती, मरीना प्रकल्प, कोळसा, या विषयांचा समावेश आहे.
सुमारे 30 लोकांनी कोरोनातील मार्गदर्शक तत्वे पाळून हातात शेती वाचवा, सेव्ह मोले, व्ही वाँट अवर फिल्ड, आमका नाका मरीना यासारखे फलक हातात घेऊन निषेध नोंदविला. पणजीसोबत मडगाव येथे देखील मडगाव सर्कलकडे उभे राहून या गोष्टींचा निषेध नोंदविला.