बेळगाव /प्रतिनिधी
खादीमीन एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिर रविवार दि. 29 नोव्हेंबर रोजी खानापूर रोडवरील सेंट अँथोनी चर्चच्या समोर पार पडले. यावेळी जवळपास 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
खादीमीन एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने 2015 पासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षात या संस्थेकडून जवळपास 1000 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. सर्वात मोठा माणुसकी धर्म आहे. त्यामुळे जातभेद पंथ सर्व विसरून सर्व स्तरातील रुग्णांवर लवकरात लवकर उपचार व्हावे याकरिता रक्तदान सर्वश्रे÷ दान असे मानत या संस्थेच्या वतीने रक्तदान करण्यात येते.
यावेळी संकलित केलेले रक्त डॉक्टर प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटलला देण्यात आले. यावेळी कामिल बेपारी, नियाज काझी, अल्ताफ मुजावर, रिजवान अफगाणी, अब्दुल गफरशेख, यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.