खानापूर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा झाला सात
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्मयात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाला नसल्याने दिलासा मिळाला असतानाच मंगळवारी आणखी दोन पॉझिटिव्हची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता सातवर पोहोचली आहे. मंगळवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या त्या दोन रुग्णांमध्ये शहरातील एका 66 वषीय वृद्धाचा समावेश असून दुसरा जांबोटीजवळील चापोली गावचा 45 वषीय रहिवासी आहे. 66 वषीय वृद्धाला बेळगावातील के एल ई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीच्या निवासस्थान परिसराचा दुतर्फा शंभर फूट भाग सीलबंद करण्यात आला आहे. जांबोटी भागातील चापोली येथील हा 45 वषीय गोवा येथील हॉटेल कामगार असून तो काही दिवसांपूर्वी येथे आला होता. गेल्या दोन दिवसात जांबोटी बाजारपेठेतही तो फिरला असल्याने चापोली गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.