प्रतिनिधी / खानापूर
बेळगाव-पणजी महामार्गावरील मऱयाम्मा मंदिराचा (ता. खानापूर) पायाभरणी समारंभ सोमवार दि. 8 रोजी मोठय़ा उत्साहात पार पडला. पायाभरणी समारंभात मदतीचा ओघ मोठय़ा प्रमाणात आल्याने मंदिर जीर्णोद्धाराच्याला बरीच गती आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष तमाण्णा गावडे होते.
नारायण विठ्ठल होळणकर, नामदेव शिवनगेकर, विद्यानंद नार्वेकर, नामदेव पाटील, प्रविण पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. नरेश कुमार जोरापूर यांनी मऱयाम्मा देवीचे पूजन केल्यावर घाडी पुजाऱयांनी गाऱहाणे घातले. चंद्रशेखर कोडोळी, गंगाराम मंजेलकर, शंकर चौगुले, सुनिल हंजी, संजीव कागती, राजू किरमीटे, अरुण खानापुरी, यल्लाप्पा खानापुरी, महेश चौगुले यांनी पायाभरणी केली.
जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य प्रकाश देशपांडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन मंदिर जीर्णोद्धार करण्यामागचा उद्देश विशद केला. या जीर्णोद्धारासाठी जवळपास 25 लाख रुपयाचा खर्च अपेक्षित असून यासाठी जनतेने मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले. यावेळी तमाण्णा गावडे व इतरांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जी. पी. शेट्टी 25000 रुपये, शंकर वडियार 11111, सीताकांत जोशी 11001, शंकर चौगुले 11000, बळवंत घाडी 10000, मल्लाप्पा मेणशिनकायी 10000, गोपाळ बेळगावकर 5011, नरसाप्पा शिंगाडे 5101, महादेव अल्लोळकर 5001, तमाण्णा गावडे 5011, हणमंत वडियार 5000, चंद्रशेखर कोडोळी 5000, धाकलू घाडी 5000, नामदेव पाटील 501 तसेच वस्तूरुपात नारायण होळणकर 12 एमएम 60 बार, राजेश पासलकर 12 एमएम 7 बंडल लोखंड, खडी, वाळू, बोर्डर प्रत्येकी एक ट्रिप, 25 पोती सिमेंट तसेच विद्यानंद नार्वेकर 10 एमएम 5 बंडल लोखंड, प्रविण पाटील 8 एमएम 100 किलो लोखंड, नामदेव पाटील 6 एमएम 100 किलो लोखंड, महेश चौगुले 10 एमएम 9 बार तसेच जोतिबा ट्रेडर्सचे मालक नामदेव शिवनगेकर यांनी मंदिराच्या स्लॅबसाठी लागणारे सिमेंट देण्याचे जाहीर केले आहे. कार्यक्रमाला खानापूर, हलकर्णी, गांधीनगरमधील नागरिक उपस्थित होते.