प्रतिनिधी/ खानापूर
खानापूरातील बसस्टँडवरच्या सर्कलचे 1980 साली राजा शिवछत्रपती चौक असे नामकरण झाले होते. नगरपंचायतीने त्यावेळी चौकात फलकही लावला होता. पण गेल्या काही दिवसांपुर्वी तो फलक मोडून पडला होता. त्याबद्दल फेसबुकमधून फोटोसह त्याचे चित्रीकरण करुन सर्व व्हॉसअप गुपवर पाठविण्यात आले होते. याची दखल भाजपचे युवा नेते पंडित ओगलें यांनी घेतली. व शहरातील भाजपचे सामान्य कार्यकर्ते व हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून शुक्रवारी पुन्हा एकदा नवीन नामफलक व भगव्या ध्वजाचे अनावरण केले.
प्रारंभी नगरसेवक नारायण ओगले व भाजपचे प्रसिध्दी प्रमुख राजू रायका यांच्या हस्ते नामफलकाची पुजा करण्यात आली. तर पंडित ओगले व राज गावडे यांच्या हस्ते नामफलकावर भगवा ध्वज फडकवण्यात आला यावेळी बोलताना पंडित ओगले म्हणाले, काही लोकांना चांगले कार्य करण्यापेक्षा एखाद्या घटनेची सोशल मिडीयावर प्रसिध्दी करुन मज्जा बघण्याची सवय आहे. पण हल्लीच्या काळात असे ही युवक आहेत की ते प्रसिध्दीपासून अलीप्त राहुन चांगले विधायक कार्य करण्यासाठी धडपडत असतात. अशा कार्यकर्त्यांच्या तसेच भाजपातील सामान्य युवा कार्यकर्त्यांच्या सहकार्यातूनच राजा शिवछत्रपती चौक नामफलकाचे अनावरण करण्यात येत आहे. या कार्यात सहकार्य पेंलेल्या सर्वांनाच त्यांनी धन्यवाद दिले. हा नामफलक बसविण्यासाठी राजु गावडे, साई ओगले, किरण तुडवेकर, संजय मयेकर, लक्ष्मण येळ्ळूरकर यांनी विशेष प्रयत्न केले. या सोहळय़ाला नगरसेवक विनायक कलाल, नितीन पाटील, विशाल सावंत, दत्ता वंजारे, ज्ञानेश्वर देवलतकर, किरण अष्टेकर, लोकेश कलबुर्गी, विशाल कलबुर्गी, अनंत सडेकर, गौतम जाणवेकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.