बेंगळूर : राज्यात पुढील 15 दिवसात कोरोना परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य आणीबाणीची घोषणा करून खासगी रुग्णालयातील 50 टक्के बेड्स ताब्यात घ्यावेत, अशा मागणीचे पत्र खासदार शोभा करंदलाजे यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना लिहिले आहे. याला सकारात्मक उत्तर देताना सरकारचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांनी, ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून उपाययोजना हाती घेतल्या जातील, असे सांगितले आहेत. पुढील दिवसात राज्यात व्हेंटिलेटरची संख्या आवश्यक असल्याने बेंगळुरात अतिरिक्त एक हजार आणि राज्याच्या इतर भागात एक हजार व्हेंटिलेटरची संख्या वाढवावी, लहान-लहान रुग्णालयांना अर्थिक मदत करून व्हेंटिलेरची संख्या वाढविण्यास प्रोत्साहन करावे, असा सल्लाही करंदलाजे यांनी पत्राद्वारे दिला आहे.
Previous Articleराज्यात एकाचदिवशी 34 हजारांवर नवे रुग्ण
Next Article ’गाव आलं गोत्यात 15 लाख खात्यात’ची घोषणा
Related Posts
Add A Comment