ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात 2023 पासून खासगी रेल्वे धावणार आहेत. 109 मार्गांवर 151 खासगी रेल्वे गाड्या चालवण्यात येणार असून, त्यासाठी खासगी क्षेत्रातील 30 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
काही प्रसिद्धी माध्यमातून मार्च 2024 पासून खासगी रेल्वे प्रकल्प सुरू होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. खासगी रेल्वे मार्च 2023 पासूनच धावतील. त्याबाबतच्या निविदांना मार्च 2021 पूर्वी अंतिम रुप देण्यात येईल.
खासगी रेल्वेचा 12 गाड्यांचा पहिला ताफा 2022-23 मध्ये, 45 गाड्यांचा दुसरा ताफा 2023-24 मध्ये, 50 गाड्यांचा तिसरा ताफा 2025-26 तर 44 गाड्यांचा चौथा ताफा त्यापुढील आर्थिक वर्षात सुरू केला जाईल. एकूण 151 खासगी रेल्वे गाड्या 2016-27 पर्यंत धावतील, त्यासाठीचे वेळापत्रक देखील तयार करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.