बोनी कपूर यांनी दिली माहिती
जान्हवी कपूरच्या बॉलिवूड पदार्पणानंतर तिची छोटी बहिण खुशी देखील लवकरच चित्रपटजगतात पाऊल ठेवणार असल्याची चर्चा सुरू होती. विदेशात फिल्म मेकिंग कोर्स पूर्ण करून परतलेली खुशी लवकरच रुपेरी पडद्यावर स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवताना दिसून येणार आहे.

खुशीचे पदार्पण वडिल बोनी कपूर यांच्या चित्रपटाद्वारे होणार असल्याचे मानले जात होते. परंतु बोनी कपूर यांनी खुशीच्या बॉलिवूड पदार्पणात आपले कुठलेच योगदान नसणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
खुशी चित्रपटसृष्टीत हिंदी चित्रपटाद्वारेच पाऊल ठेवणार आहे. ती दाक्षिणात्य चित्रपट करत नसून यासंबंधी केवळ अफवा सुरू आहेत. मुंबईत राहूनच ती स्वतःची कारकीर्द घडविणार आहे. तिने चित्रपट स्वीकारला असून त्याचे चित्रिकरण मार्च महिन्यात सुरू होणार आहे. हा चित्रपट अत्यंत चर्चेत राहणार आहे. यंदाच्या बिग बजेट चित्रपटांपैकी हा एक असणार आहे. खुशीच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल अत्यंत आनंदी असल्याचे बोनी यांनी सांगितले आहे. बोनी कपूर यांनी जान्हवी आणि अर्जुन यांच्यासोबत चित्रपट निर्माण करण्याची तयारी चालविली आहे.