प्रतिनिधी / खेड
तालुका शिवसेनेच्यावतीने शनिवारी दुपारी गांधीचौक येथे केंद्र सरकारने वाढवलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात निदर्शने करत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेयांच्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा निषेध नोंदवला.
दरवाढ कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. वाढत्या महागाईला आळा घालावा, अशा मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना देण्यात आले. ही निवेदने केंद्र सरकारपर्यंत पाठवण्याचे आश्वासन सेनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख निकेतन पाटणे, पंचायत समिती सभापती विजय कदम, शैलेश कदम, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, राकेश सागवेकर, वहाबसेन, दर्शन महाजन, संदिप कांबळे यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.