ऑनलाईन टीम / गडचिरोली :
गडचिरोलीतील उत्तर-पूर्व भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत पोलिसांनी 5 नक्षलवाद्यांना ठार केल्याचे वृत्त आहे.
आज गडचिरोलीच्या धानोरा भागातील जंगलात काही नक्षलवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या सी-60 पथकाने शोधमोहिम हाती घेतली. दरम्यान, छत्तीसगढच्या सीमेजवळ नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे शिबीर उध्वस्त करत 5 नक्षलवाद्यांना ठार केले. त्यामधील काही नक्षलींचे मृतदेह हाती आले आहेत.