प्रतिनिधी / गणपतीपुळे
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर चालणारा पर्यटकांचा खास आकर्षण असलेला वॉटरस्पोर्ट व्यवसाय अद्यापही बंदच असल्याने स्थानिक बोटींग व्यावसायिकांवर टांगती तलवार आली आह़े.
गेल्या दिवाळीत पर्यटन हंगामापासून पर्यटन हंगाम चांगल्या प्रकारे सुरळीत होईल, अशा आशेवर स्थानिक सर्वच वॉटरस्पोर्ट व्यवसायिक ऐन दिवाळी हंगामात सुरू केलेल्या वॉटरस्पोर्ट व्यवसायाला शासनाच्या बंदर खात्यातून परवानगीचे कारण पुढे करून कोरोना महामारीच्या संदर्भातील नियम व अटींचे पालन करण्याचे बंधन लागू करण्यात आल़े. एकूणच जोपर्यंत शासनाच्या बंदर खात्याकडून रितसर परवानगीचे परिपत्रक येत नाही. तोपर्यंत स्थानिक सर्वच लहानमोठ्या वॉटरस्पोर्ट व्यवसायिकांनी समुद्रातील वॉटरस्पोर्ट व्यवसाय बंद ठेवावा. असे जिह्यातील बंदर खात्याच्या विभागाकडून कळविण्यात आल़े त्यामुळे शासनाच्या आदेशाचे पालन करून स्थानिक सर्वच वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांनी वॉटरस्पोर्ट व्यवसाय आजतागायत बंद ठेवला आहे.
असे असतानाच गेल्या काहीच दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिह्यातील वॉटरस्पोर्ट व्यवसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे वॉटरस्पोर्ट बंदी उठवण्याबाबत दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन स्थानिक वॉटरस्पोर्ट सुरू करण्याचे आदेशानंतर रत्नागिरी जिह्यात ही स्थानिक वॉटरस्पोर्ट व्यवसायिकांनी एकवटत रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली ही वॉटरस्पोर्ट व्यवसायाबाबत कैफियत मांडल़ी.
अखेर रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही वॉटरस्पोर्ट व्यवसायाला सुरू करण्याबाबत परवानगीचे आदेश दिल्याने स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळाला होत़ा. परंतु आता व्यवसायाकडून सांगण्यात येत आहे, राज्य शासनाच्या बंदर खात्याकडून अद्याप परवानगी मिळाल्यानंतरच वॉटरस्पोर्ट व्यवसायाला आम्ही सुरूवात करु. त्यामुळे एकीकडे लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर सर्वच व्यवसाय व जीवनावश्यक गोष्टींना शासन परवानगी देत असतानाच दुसरीकडे वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांना केवळ नियम व अटींची बंधने लागू करून शासनाचा बंदर खात्याकडून टांगती तलवार आणली जात असल्याने येणाऱ्या पर्यटकांना मात्र वॉटरस्पोर्टची पतिक्षाच लागून राहणार आह़े.
वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांवर उपासमारीचे सावट
शासनाच्या बंदर खात्याकडून वॉटरस्पोर्ट व्यवसायाला अद्याप परवानगीचे आदेश मिळत नसल्याने बॅकांकडून कर्जे काढून वॉटरस्पोर्ट करणाऱ्या सर्वच लहानमोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे शासनाच्या नियमांचे बंधन, परवानगीचे आदेश असे असतानाच दुसरीकडे कधी समुद्राच्या पाण्याचा बदलता प्रवाह, तर कधी एखाद्या मोठ्या वादळाचे सावट अशी परिस्थीती वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांवर उद्भवत असतो. त्यामुळे अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत करावा लागणारा वॉटरस्पोर्ट व्यवसाय सर्वच स्थानिक व्यावसायिकांसाठी डोकेदुखीच ठरला आहे.
प्रमोद डोर्लेकर, वॉटरस्पोर्ट व्यावसायिक
वॉटरस्पोर्ट व्यावसायिक पमोद डोर्लेकर यांनी सांगितले की, यंदा पहिल्यांदाच बंदर खात्याचा आठमुढी धोरणामुळे आमचा व्यवसाय आर्थिक संकटात आला आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ असताना बँकाचे कर्ज कसे फेडायचे, कामगारांचे जेवण व पगार, इतर मेटेंनन्स खर्च असे प्रश्न सध्या उभे राहिले आहेत. त्यामुळे याचा सारासार विचार करुन शासनाच्या बंदरखात्याने वॉटरस्पोर्टबाबत निर्णय घ्यावा असे आमचे मत आहे.
-उदय पाटील, अध्यक्ष वॉटरस्पोर्ट व्यावसायिक संघटना, गणपतीपुळे.
गणपतीपुळे येथे गेल्या काही वर्षांपासून वॉटरस्पोर्ट व्यवसाय सुरु आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्दुभावामुळे वॉटरस्पोर्ट व्यवसायावर परवानगीची टांगती तलवार असल्याने आम्ही वॉटरस्पोर्ट व्यवसाय बंद ठेवला आहे. मात्र शासनाच्या बंदर खात्याने सकारात्मक विचार करुन वॉटरस्पोर्ट व्यवसायाला परवानगीचे आदेश देण्याची गरज आहे.