चिपळूण तुरंबव-कापसी नदी येथील घटना -तरुणाचा शोध सुरु
चिपळूण
पाच दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी तुरंबव परिसरातील कापसी नदीत गेलेला तरूण दगडावरुन पाय घसरून नदीत तोल जाऊन पडून बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. हा तरुण नदी परिसरात न सापडल्याने त्याचा बुधवारी शोध सुरू होता. सावर्डे पोलीस स्थानकात या बाबत बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली आहे.
रजनीकांत गोपीनाथ पंडित (34, तुरंबव-गणेशवाडी, ता. चिपळूण) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंडित हा पाच दिवसाच्या गणेश विजर्सनासाठी तुरंबव परिसरातील कापसी नदीत गेला होता. यावेळी त्याचा पाय एका दगडावरुन घसरल्याने तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला. यावेळी त्याचा शोध घेतला असता तो कोठेही सापडलेला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी गेले होते. बुधवारी देखील कापसी नदी पसिरात त्याची शोधमोहीम सुरु करण्यात आली.