कसबा बीड/ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील गणेश वाडी गावांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 महिला, 5 पुरुष, व 3 जनावरे जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्याच्या या हल्ल्यामध्ये गेले दोन दिवस सर्व नागरिक हैराण झाले आहेत. जखमींवर ताबडतोब शिरोली येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत व गावातील इतर नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती सरपंच दादासो लाड यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली. यावेळी आरोग्यसेवक आनंदा बाटे, पोलीस पाटील धनश्री मेढे, व पंढरीनाथ तहसीलदार, तलाठी एन पी पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तिबिले आदी उपस्थित होते.
Related Posts
Add A Comment