वाढत्या उन्हाचा परिणाम : विविधरंगी माठांचे आकर्षण
प्रतिनिधी /बेळगाव
वाढत्या उष्णतेमुळे थंडगार पाण्याने तहान भागविण्यासाठी मातीच्या माठांना मागणी वाढली आहे. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱया माठांची खरेदी होऊ लागली आहे.
दिवसेंदिवस पारा वाढत चालला आहे. शहराचा पारा 36 अंशांहून पुढे गेल्याने शरीराची लाहीलाही होत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत शीतपेये व इतर थंड पदार्थांना मागणी वाढत आहे. याबरोबर नळ लावलेले विविधरंगी माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. हळुहळु उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे बाजारात शीतपेयांबरोबर फळांना आणि भाजीपाल्याला मागणी वाढत आहे.
मागील दोन वर्षात कोरोना लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे या व्यवसायाला फटका बसला होता. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने माठांना मागणी वाढली आहे. विविध आकारांमध्ये माठ उपलब्ध आहेत. वाहतूक खर्च वाढल्याने गतवषीच्या तुलनेत यंदा माठांच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण 300 ते 600 रुपयांपर्यंत माठांचा दर आहे. याबरोबर विविध रंगांमध्ये ठेवलेले माठ ग्राहकांना आकर्षित करत
आहेत.
विनायक गुंजीकर (माठ विपेते)
उन्हाळा वाढत असल्याने माठांची विक्री सुरू झाली आहे. विविध आकारांमध्ये आणि रंगांमध्ये माठ ठेवले आहेत. सध्या ढगाळ वातावरण असले तरी उन्हाचा तडाखाही वाढत असल्याने माठांना मागणी वाढत आहे.