कोलकाता
कोरोना व्हायरस प्रसारामुळे अनेक गरीब कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. झारखंड रणजी संघातील फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमने सुमारे 350 गरजू कुटुंबीयांसाठी मदत सुरू केली आहे. शाहबाज नदीम याचे वास्तव्य धनबादमध्ये असून कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण परिसर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील गरीब 350 कुटुंबीयांना शाहबाज नदीमने तांदूळ, पालेभाजी, साखर व इतर खाद्यपदार्थांचे वाटप केले आहे. 30 वषीय शाहबाज नदीमने गेल्या वषी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. 2020 च्या आयपीएल हंगामासाठी सनरायजर्स हैद्राबाद संघाने शाहबाज नदीमला खरेदी केले होते. पण कोरोना व्हायरसमुळे सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.