नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गॅझेट नोटिफिकेशन काढून चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली आहे. हे पुरस्कार भारतीय पॅनोरामा विनियम 2019 अंतर्गत दिले जाणार आहेत. 26 पुरस्कारप्राप्त चित्रपटांमध्ये सर्वाधिक चित्रपट बॉलिवूडमधील आहेत. पंगचेन्पा, ईरुला, पनिया भाषांमधील चित्रपटही पुरस्काराच्या यादीत सामील आहेत. बॉलिवूडमधील उरी द सर्जिकल स्ट्राइक, सुपर 30, गली बॉय, बधाई हो या चित्रपटांना पुरस्कार मिळणार आहे. तर नॉन फिचर फिल्म वर्गवारीत विक्रमजीत गुप्ता यांचा ब्रिज, विकास चंद्रा यांचा माया, पंकज जोहर यांचा सत्यार्थी, विभा बक्षी यांच्या सनराइजचे नाव सामील आहे. निर्णायक मंडळाच्या शिफारसींवर काही चित्रपटांची निवड करण्यात आली असून त्यांना सरकारकडून पुरस्कार दिला जाणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले गेले आहे. परंतु या यादीत कंगना रनौत हिचा मणिकर्णिका हा चित्रपट सामील करण्यात आलेला नाही.
Previous Articleपीएमओ अन् महत्त्वाच्या मंत्रालयांमध्येच हेरगिरी
Next Article नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा
Related Posts
Add A Comment