समरजीत घाटगे यांचा मुश्रीफ यांच्यावर हल्ला
प्रतिनिधी / कोल्हापूर
मी राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारसदार आहे. गल्लीबोळात दिल्या जाणा-या फुटकळ धमक्या मला देऊ नका. कुणाचा पैरा कधी आणि कसा फेडायचा हे मला चांगले माहीत आहे. असा खणखणीत इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी मंत्री मुश्रीफ यांना लगावला आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा गैरवापर केल्याचा आरोप केल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि जिल्हा अध्यक्ष समर्जीत घाटगे यांचे हे षडयंत्र आहे. यांच्या माहितीनुसार सोमय्यांनी बेताल आरोप केले आहेत. असे मुश्रीफ यांनी म्हटले होते. यावर समरजीत घाटगे आणि प्रत्युत्तर दिले आहे.