खडेबाजार पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बुरूड गल्ली, बोळ परिसरात गांजा विकणाऱया एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्या जवळून 570 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
अबिद हजरतसाब मुजावर (वय 34, रा. आझादनगर, सहावा क्रॉस) असे त्याचे नाव आहे. त्याच्या जवळून 570 गॅम गांजा, 600 रुपये रोख रक्कम, एक मोबाईल संच, केए 22 बी 6421 क्रमांकाची ऑटोरिक्षा असा एकूण 47 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, हवालदार एस. एम. शिंदे, व्ही. एन. कंटीकर, एम. एस. हणगंडी, बी. पी. उज्जीनकोप्प, आर. बी. गणी, शिवाप्पा इराप्पा व अबकारी अधिकारी सी. एस. पाटील आदींनी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे. बुरूड गल्ली, बोळ परिसरात गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे.