आमदार अदिती सिंह यांचा शाब्दिक प्रहार
उत्तरप्रदेशच्या रायबरेली शहर मतदारसंघात सप, भाजप आणि काँगेस यांच्यात त्रिकोणी लढत दिसून येत आहे. येथील भाजप उमेदवार अदिती सिंह यांनी काँग्रेसवर हल्ला चढवत गांधी परिवार केवळ डायलॉगबाजी करत असल्याचे म्हणत काँग्रेसने रायबरेलीसाठी काहीच केले नसल्याचा आरोप केला.

अदिती यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे कौतुक केले आहे. इराणी यांनी अलिकडेच रायबरेलीत रुग्णालय सुरूर करण्याचा निर्देश दिला आहे. प्रियंका वड्रा आता रायबरेलीची मदत करण्याबद्दल बोलत आहेत. संकटाच्या काळात वड्रा यांनी जिल्हय़ाचा एकही दौरा केला नव्हता. भावाबहिणीची जोडी (राहुल गांधी अन् प्रियंका वड्रा) प्रत्येक निवडणुकीत तीच जुनी विधाने करतात आणि त्यानंतर तोंड दाखविण्याची तसदीही घेत नसल्याची टीका अदिती यांनी केली आहे.
काँग्रेसकडे करण्यासाठी काहीच नसल्याने रायबरेलीतील विकासकामांचा शेय घेत आहेत. मागली 60 वर्षांमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कितीवेळा रायबरेलीचा दौरा केला असे प्रश्नार्थक विधान करत अदिती यानी डायलॉगने काहीच होणार नसल्याने लोक ओळखून असल्याचे म्हटले आहे.
उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत भाजप रायबरेली जिल्हय़ातील बहुतांश मतदारसंघांमध्ये विजय मिळविणार आहे. यंदाची निवडणूक भाजप जिंकणार असून ध्रूवीकरणाची कुठलीच गरज नाही. भाजप सरकारने अपेक्षेपेक्षा अधिक चांगले काम केल्याचे त्या म्हणाल्या.
उत्तरप्रदेशातील रायबरेली शहर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. दिवंगत काँग्रेस नेते अखिलेश सिंह येथे 5 वेळा आमदार राहिले आहेत. अखिलेश यांची कन्या अदिती यावेळी भाजपच्या उमेदवार आहेत.