प्रतिनिधी / फलटण :
पुण्यातील एका व्यापाऱ्याची जिंती नाका फलटण येथे गाडीची काच फोडून पाच लाख तीस हजाराची रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरटय़ांनी चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरटय़ाच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, अर्मितलाल वर्दीचंद ओसवाल (वय 51 वर्षे व्यवसाय हार्डवेअर रा बी/11,श्रीकृष्ण सोसायटी, शंकरशेठ रोड पूणे, जि. पूणे) यांचे स्वत:चे भवानीपेठ पूणे येथे स्वाती हार्डवेअर सप्लायर दुकान असून, ते इतर किरक़ोळ हार्डवेअर विक्री करण्याऱ्या दुकानदारांना मालाचा पुरवठा करतात. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सक़ाळी 10 वाजण्याच्या सुमारास भवानी पेठ पूणे येथून किरक़ोळ विक्री दुकानदाराकडे पेमेंट घेणेसाठी ग्रे रंगाची टोयोटा अल्टीस घेऊन सोमेश्वर निरा लोणंदहुन फलटणमध्ये आले होते. यावेळी गोळा केलेली रोख रक्कम त्यांच्याकडील क़ाळ्या रंगाच्या हँण्डबँगमध्ये ठेवली होती.
फलटणमधील काही दुकानदारांकडून रोख रक्कम घेऊन यानंतर जेवण करून 4 वाजण्याच्या सुमारास जिंती नाका येथील एस आर जांगीड अँण्ड ग्लास फलटण या दुकानासमोर कार लावत ओसवाल पेमेंट घेण्यासाठी गेले. ओसवाल यांनी कारमध्ये ड्रायव्हर शीटच्या बाजूला शीटवर कँश असलेली क़ाळी बँग ठेवली होती. थोडया व़ेळात ओसवाल याना दुकानातील कामगार याने तुमची कारची काच फुटली असल्याचे सांगितले. लगेचच ओसवाल यांनी कारजव़ळ जावून पाहिले असता कारची समोरील ड्रायव्हरच्या शेजारील बाजूची काच फुटलेली दिसली व शीटवरील रोख रक्कम ठेवलेली क़ाळी बँग लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांत धाव घेतली. फलटण शहर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.