के. के. कोप्प येथे अबकारी विभागाची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
के. के. कोप्प (ता. बेळगाव) येथे गावठी दारु विकणाऱया एका महिलेला अबकारी दक्षिण विभागाच्या अधिकाऱयांनी अटक केली आहे. तिच्या जवळून 8 लीटर गावठी दारु जप्त करण्यात आली आहे.
गंगव्वा सन्नाप्पा बडस (वय 55 रा. के. के. कोप्प) असे त्या महिलेचे नाव आहे. अबकारी दक्षिण विभागाचे निरीक्षक मंजुनाथ मेळळीगेरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन गंगव्वाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
के. के. कोप्प परिसरात दारु विक्री बंदी असताना गावठी दारुची विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून गंगव्वाला अटक करण्यात आली. दारुबंदीच्या काळात गावठी दारु विक्री जोरात सुरु आहे. त्यामुळे अधिकाऱयांनी कारवाई तीव्र केली आहे.