वार्ताहर /माशेल
माशेल येथील श्री दुर्गादत्त मंदिरात गुरुप्रतिपदेनिमित्त ‘गीत गुरुचरित्र’ या कथात्मक सांगीतिक कार्यक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दत्त संप्रदायाच्या गुरुचरित्र या पवित्र गंथात श्री दत्तात्रय तसेच श्रीपाद वल्लभ व नरसिंह सरस्वती या त्यांच्या दोन अवतारांचे महात्म्य वर्णिले आहे.
या सर्व कथा गीत स्वरुपात जयसिंगपूर येथील दत्तभक्त श्रीपाद पुजारी यांनी गीत गुरुचरित्रातून श्रोत्यांसमोर सादर केल्या. पूजारी यांनी गीत चरित्र हे पुस्तक लिहिले असून त्यावर हा सांगीतिक कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. कार्यक्रमाची निर्मिती संगीत व गायन गौरीश तळवलकर यांची असून त्यांना हार्मोनियमवर प्रसाद नाईक, तबल्यावर सुजल उसगांवकर, चिपळीवर मिलिंद तळवलकर यांनी साथसंगत केली. ऍड. राजू ढवळीकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.