सध्या सोन्याला चांगलीच झळाळी आली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रम 38,950 रुपये इतकी होती. आता सोन्याच्या किंमतींनी प्रति 10 ग्रम 54 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याने वर्षभरातच 38 कोटी रुपये परतावा दिला आहे. त्यामुळे सोन्यातली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घ्यायला हव्यात.
तुम्हाला दागिने करायचे आहेत का निव्वळ गुंतवणुकीसाठी सोन्यचा विचार करत आहात हे आधी ठरवा. तुम्ही सोन्याची नाणी, विटा किंवा दागिने घेऊ शकता. सोनं ऑनलाईनही खरेदी करता येतं. मात्र यासाठी तुमच्या ओळखीतला आणि विश्वासू सराफ हवा.
गोल्ड ईटीएफचा पर्याय तुमच्याकडे आहे. ही म्युच्युअल फंडांमधली एक योजना असून या फंडांची शेअर बाजारात खरेदी आणि विक्री करता येते. गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी तुमचं डिमॅट खातं असावं लागतं. ईटीएफची विक्री केल्यानंतर तुम्हाला सोनं मिळत नाही तर त्यावेळच्या सोन्याच्या बाजारमूल्याएवढी रक्कम मिळते. तुम्ही सोवरेन गोल्ड बाँड खरेदी करू शकता. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून हे बाँड जारी केले जातात.