नवी दिल्ली
फोर्ड आणि गुगल यांनी एकत्र सहा वर्षासाठी योजना आखण्यासंदर्भात करार केल्याची घोषणा केली आहे. याच्याअंतर्गत 2023 पासून फोर्ड आपल्या सर्व कार आणि ट्रक यांना इंफोटेनमेंट स्क्रीनमध्ये गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमच्या अंतर्गत चालकांना या वाहनांच्या नेव्हीगेशनसाठी गुगल मॅप आणि विना अँड्रॉइड फोनच्या चालकांना गुगल वॉयस असिस्टंटचा वापर करता येणार आहे.