ऑनलाईन टीम / राजकोट :
गुजरातमधील राजकोटमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टल स्केल एवढी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के दुपारी 12 वाजून 8 मिनिटांनी जाणवले. भूकंपाची जाणीव होताच नागरिकांनी घरातून बाहेर पडले. दरम्यान, यामध्ये कोणत्याही प्रकरची जिवीतहानी झालेली नाही आहे.