अहमदाबाद
गुजरात हे राज्य सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत अग्रेसर होताना दिसते आहे. या राज्यात अलीकडच्या वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी अगदी 950 टक्क्यांनी वाढीव नोंदली असल्याचे दिसून आले आहे. 2019 अखेर राज्यात 950 इलेक्ट्रिक वाहनांची मागणी नेंदवली गेली होती. पण 2020 मध्ये ही मागणी वाढून 1 हजार 119 वाहनांवर पोहचली. तर मागच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये 9 हजार 780 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री एकटय़ा गुजरातमध्ये झाली. जवळपास 956 टक्के इतकी मागणी वाढल्याचे दिसले.