ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातमध्ये बुधवारी सकाळी एका गोडाऊनमध्ये मोठा स्फोट झाल्याने चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाचा धक्का एवढा जबर होता की, या स्फोटामुळे गोडाऊनमधील माल आणि भिंत आंगवर कोसळल्याने चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. भिंत आगवर कोसळण्याने यामध्ये 12 जण दबले गेले. यातील 8 जखमींना एलजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून मदत कार्य सुरू आहे. यातील 12 जणांना बाहेर काढले असून यातील चार जण गंभीर जखमी तर आठ जण जखमी झाले आहेत.
पिराना पिपळज रोड वर हा स्फोट झाला असून, यामध्ये जखमी झालेल्या एकूण 12 जणांपैकी 4 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 8 जणांवर उपचार सुरू आहेत.