ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरात सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील 36 शहरांमध्ये 28 मे पर्यंत नाईट कर्फ्यू वाढविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळी लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सकाळी 9 ते दुपारी 3 या काळात दुकाने, मॉल, व्यावसायिक प्रतिष्ठान सुरू ठेवले जाणार आहेत.
सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील 36 शहरांमध्ये 28 मे पर्यंत रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 4,773 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 64 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील एकूण संख्या 7 लाख 76 हजार 220 वर पोहोचली असून यातील 6,77,798 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 9,404 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.