सोने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहने, गृह खरेदीसाठी पसंती : व्यापाऱयांमधून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
मंगळवारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱया गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह दिसून आला. सोने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहने, गृह खरेदीला बेळगावच्या ग्राहकांनी पसंती दिल्याचे दिसून आले. यामुळे बऱयाच दिवसांनंतर बाजारपेठेत कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाली आहे.
मंगळवारी बेळगावची बाजारपेठ तशी बंद असते. परंतु यावषी गुढीपाडवा आल्याने बाजारपेठ सुरू होती. सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह दिसून आला. सध्या सुरू असणाऱया परिवहन कर्मचाऱयांच्या बस बंदचा फटका ग्रामीण भागातून बाजारात येणाऱया ग्राहकांना बसला. तरी देखील खरेदीसाठी उत्साह दिसून येत होता. परंतु सायंकाळी सहानंतर सुरू झालेल्या पावसामुळे गर्दी विरळ झाली. पावसाच्या जोरदार सरीमुळे खरेदीच्या उत्साहावर विरजन पडले.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी
मागील काही दिवसांपासून मंदावलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीला मंगळवारी चांगली सुरुवात झाली. टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, वॉशिंग मशीन, एसी यासह इतर उपकरणांच्या खरेदीसाठी नागरिकांनी दुकान तसेच मॉलमध्ये गर्दी केली होती. कंपन्यांनीही गुढीपाडव्याला आकर्षक ऑफर दिल्याने विक्रीत वाढ झाल्याचे विपेत्यांनी सांगितले.
दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीला उत्साह
मंगळवारी दुचाकी, चारचाकी, ट्रक्टर यांच्या खरेदीला उत्साह दिसून आला. पाडक्याच्या मुहूर्तावर वाहन घेण्यासाठी ग्राहकांनी बुकिंग करून ठेवले होते. त्यामुळे वाहन खरेदी करणे त्यांच्यासाठी सुलभ झाले. सर्वाधिक विक्री ही दुचाकी वाहनांची झाल्याचे दिसून आले. वाहने पाहण्यासाठी व त्यांची चौकशी करण्यासाठी ग्राहकांची शोरूममध्ये गर्दी दिसून आली.
गृह खरेदीला पसंती
नवीन फ्लॅट खरेदी तसेच प्लॉट खरेदीसाठी मंगळवारी ग्राहकांनी पसंती दिली. नवीन घरांच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी गृह प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली तर अनेकांनी नवीन घरांच्या चाव्या घेतल्या.
सोने खरेदीला पहिली पसंती गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्त्व आहे. पुढील काळात होणाऱया लग्नसराईसाठी या दिवशी सोने खरेदी केली जाते. यामुळे शहापूर व बेळगाव या दोन्हीही सराफी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. शहापूर येथील सराफी पेढय़ांसमोर खरेदीसाठी शहर तसेच ग्रामीण भागातील ग्राहक दाखल झाले होते. मध्यंतरीपेक्षा सोन्याचे दर आता कमी झाल्यामुळे खरेदीला उत्साह दिसून आला.