आदित्य-मृणाल ठाकूरचा चित्रपट
आदित्य रॉय कपूर आणि मृणाल ठाकूरचा चित्रपट ‘गुमराह’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरच्या प्रारंभी एक हत्या होत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. तर मृणाल ठाकूर या चित्रपटात पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची कहाणी या हत्येच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे. या हत्येप्रकरणी दोन संशयित असून दोघांचाही चेहरा एकसारखाच असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.

वर्धन केतकरच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या ‘गुमराह’ चित्रपटाची कहाणी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. ही कहाणी असीम अरोड आणि मागिज थिरुमेनी यांनी लिहिली आहे. आदित्य रॉय कपूर या चित्रपटात ऍक्शनदृश्यांमध्ये दिसून येत आहे. तर पोलीस अधिकाऱयाची भूमिका मृणालने उत्तम प्रकारे वठविली असल्याचे मानले जात आहे. रॉनित रॉय देखील यात पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांची टी-सीरिज आणि मुराद खेतानी यांच्या सिने1 स्टुडिओकडून करण्यात आली आहे. गुमराह हा चित्रपट 7 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.