वार्ताहर / आवळी बुद्रुक
राधानगरी तालुक्यातील नदीकाठच्या पिकांचे गेल्यावर्षीच्या महापुरात मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. तरी शासनाने दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई त्वरीत दयावी अशी मागणी राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आले. राधानगरी तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भोगावती नदीकाठच्या गावांना पूर आला होता या गावातील ऊस व भात या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याचा अहवाल शासनाकडे पाठवला होता. मात्र त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही या मागणीचे निवेदन तहसीलदारांकडे दिले आहे.निवेदन देताना आवळी बुद्रुकचे सरपंच सर्जेराव कवडे,तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव कवडे,मंडळ अधिकारी कदम, बर्गेवाडी जि प सदस्य पांडुरंग भांदिगरे ग्रामसेवक ढेरे,सिरसे, कौलव, गुडाळ,घोटवडे, आदी गावचे सरपंच,पोलीस पाटील,ग्रामसेवक उपस्थित होते. 2 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तो निधी आल्यानंतर नुकसान ग्रस्तांना वितरित केला जाईल असें आश्वासन तहसीलदार निंबाळकर यांनी दिले आहे.