प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक श्री दत्त जयंती उत्सव मंडळ गोंधळी गल्लीतर्फे सोमवार दि. 28 पासून दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ होणार आहे. सोमवारी सायंकाळी 7 वाजता पालखी मिरवणुकीला सुरुवात होऊन गोंधळी गल्ली, समादेवी गल्ली, गवळी गल्लीमार्गे परत गोंधळी गल्लीपर्यंत मिरवणूक निघणार आहे.
मंगळवार दि. 29 रोजी सकाळी 7 वाजता अभिषेक व सायंकाळी 5 वाजून 58 मिनिटांनी जन्मोत्सव होईल. यावेळी यमुनाताई आक्का भजनी मंडळातर्फे पाळणा गीत सादर केले जाईल. रात्री 9 वाजता लहान मुले व मुलींसाठी संगीत खुर्ची होणार आहे. बुधवार दि. 30 रोजी सायंकाळी 7 वाजता मंत्रपुष्पांजली होणार आहे. तरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा. भक्तांनी अभिषेकसाठी मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.