कोल्हापूर / प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वाढणारे रुग्ण आणि त्या तुलनेत रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कणेरी येथील श्री सिध्दगिरी हॉस्पिटलमधील कोरोना पेशंटच्या व्यवस्थेसाठी गोकुळ दूध संघातर्फे व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. चेअरमन रविंद्र आपटे यांच्या हस्ते परमपूज्य अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांच्याकडे दोन ऑक्सिजन हायफ्लो मशिन (व्हेंटिलेटर) सुपूर्त करण्यात आली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गोकुळ दूध संघाने आपली नैतिक जबाबदारी समजून नेहमीच अशाप्रकारे योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार काडसिद्धेश्वर महाराज यांनी काढले.
यावेळी माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण नरके, अरुण डोंगळे, विश्वास पाटील, विश्वास जाधव संघाचे अधिकारी एस.एम.पाटील,डी.के.पाटील, सिध्दगिरी हॉस्पिटलमधील डॉ.नाईक, डॉ.सौरभ, अर्जुन इंगळे, संजय पाटील उपस्थित होते .