ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत आणि चीनने पूर्व लडाखच्या सीमारेषेवरील सैन्य यशस्वीपणे मागे घेतल्यानंतर आता या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये आणखी एक चर्चा होणार आहे. गोग्रा आणि डेपसांगच्या मैदानातून दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यावर ही चर्चा होईल. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मागील आठवड्यात झालेल्या राजनैतिक पातळीवरील चर्चेनंतर आता दोन्ही देशांची लष्करी कमांडर स्तरावरील चर्चा होणार आहे. त्यामध्ये दमचकजवळील गोग्रा व्हॅली, डेपसांग आणि सीएनसी जंक्शन परिसरातून दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यावर चर्चा होणार आहे.