ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली भेट
प्रतिनिधी/ सातारा
सदरबझार येथील कत्तलखाना अनाधिकृतपणे सुरु आहे. अनेक तक्रारी केल्या तरीही तो सुरु असल्याचा आरोप गोरक्षकांकडून होत आहे. वाढे फाटा येथे एका कंपनीचे शेड आहे. हे शेड वापराविना पडून आहे. त्याच शेडमध्ये मोकाट जनावरे काही शेतकरी केंडून ठेवतात. त्या शेडमधील कोंडलेली जनावरे पकडून कत्तलखान्यात नेणारी काही मंडळी आहेत, असा आरोप केला. शनिवारी सायंकाळी गोरक्षकांनी गायीची सुटका केली. शाहुपूरी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. सुटका केलेल्या गायींची गोशाळेत रवानगी करण्यात आली.
वाढे फाटा येथे खेड गावच्या हद्दीत हायवेलगतच मळवी नावाच्या शिवारात एका कंपनीचे मोठे मोकळे शेड आहे. त्या शेडमध्ये मोकाट जनावरे निवाऱयाला जातात. तर काही शेतकरी आपल्या शेतात मोकाट जनावरे आढळून आल्यास त्या शेडमध्ये कोंडून ठेवतात. एका नागरिकाच्या ही बाब निदर्शनास आल्याने त्याने हा माग काढला असता शेडमध्ये गीर जातीच्या गायी आढळून आल्या. कोंडणाऱया शेतकऱयास आस्थेने विचारपूस केली असता आमच्या शेतीचे नुकसान होते म्हणून आम्ही कोंडून ठेवतो असे त्र्याग्याने बोलला. त्या नागरिकाने गोरक्षक आणि पोलिसांना याची माहिती दिली. गोरक्षक तेथे लगेच पोहचले. शाहुपूरी पोलीसही पोहचले. त्या शेतकऱयाची कसून चौकशी केली. मात्र, कोंडलेल्या मोकाट जनावरांना त्या शेडमधून सदरबझार येथील कत्तलखान्यात कत्तलीला नेणाऱया त्या अज्ञातावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे.