क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
लखनौत आजपासून होणाऱया मुश्ताक अली टी-20 क्रिकेट गोवा आपल्या स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात ओडिशाविरुद्धच्या सलामीच्या सामन्याने करेल. 9 नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धेचे आयोजन होईल.
गोव्याचा ओडिशा, पुडिचेरी, पंजाब, तामिळनाडू आणि महाराष्ट्र यांच्या गटात समावेश आहे. प्रोफेशनल क्रिकेटपटू एकनाथ केरकर याच्या कप्तानपदाखाली गोवा क्रिकेट संघटनेने 20 सदस्यीय सीनियर क्रिकेट संघ जाहीर केला असून श्रीकांत वाघ आणि शुभम रांजणे हे गोव्याचे अन्य दोन प्रोफेशनल क्रिकेटपटू आहेत.
गोव्याचा टी-20 सीनियर क्रिकेट संघ याप्रमाणेः एकनाथ केरकर (कप्तान), इशान गडेकर, वैभव गोवेकर, आदित्य कौशिक, सुयश प्रभुदेसाई, स्नेहल कवठणकर, शुभम रांजणे, मोहित रेडकर, दिपराज गावकर, अमोघ देसाई, दर्शन मिसाळ, अमुल्य पांड्रेकर, अमित यादव, मलिकसाब शिरुर, समर दुभाषी, वीजेश प्रभुदेसाई, फॅलिक्स आलेमाव, निहाल सुर्लकर, श्रीकांत वाघ व लक्षय गर्ग.
गोव्याच्या टी-20 क्रिकेट लढती याप्रमाणेः 4 नोव्हेंबर विरुद्ध ओडिशा, 5 नोव्हेंबर विरुद्ध पुडिचेरी, 6 नोव्हेंबर विरुद्ध पंजाब, 8 नोव्हेंबर विरुद्ध तामिळनाडू, 9 नोव्हेंबर विरुद्ध महाराष्ट्र.