बेळगाव
2020 हे वर्ष साऱयांच्याच लक्षात राहण्यासारखे आहे. कोरोनामुळे अक्षरश: 2020 या वर्षाने साऱयांचीच झोप उडविली होती. या वर्षाला ‘गो-कोरोना’ म्हणून निरोप देण्यात आला. त्याचवेळी नववर्षाने आम्हाला अशा कोरोनापासून तारावे अशा प्रतिक्रिया व्यक्त करत सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. 2021 साल सुख व समाधानाचे जावो अशी अपेक्षा व्यक्त करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. ‘थोडी खुशी बडा गम’ म्हणत या वषीचा 31 डिसेंबर साजरा झाला.
दरवषी सरत्या वर्षाला निरोप देताना मोठी तयारी केली जात होती. रात्री बाराच्या ठोक्मयाला ओल्डमॅनचे दहन, याचबरोबर पाटर्य़ा करून आनंद साजरा करण्याचा बेत करण्यात येत होता. मात्र, कोरोनामुळे यावषी या सर्वालाच लगाम घातल्याचे दिसून आले. यातच मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवार असल्याने अनेकांनी मांसाहाराचा बेतही रद्द केल्याचे दिसून आले.
शहरासह ग्रामीण भागात दरवषी नववर्षाची धामधूम सुरू असते. बालचमू दरवषीच ओल्डमॅन करण्याच्या तयारीत असतात. मात्र, यावषी यावरही निर्बंध आल्याचे दिसून आले. विविध हॉटेल्समध्ये नववर्ष साजरे करण्यासाठी पॅकेज ठरविण्यात येत होते. त्याला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र, यावषी कोरोनामुळे हॉटेलमधील पाटर्य़ाही बंद करण्यात आल्या होत्या.
काही ठिकाणी मात्र तरुण वर्गाने सरत्या वर्षाला निरोप देताना पाटर्य़ा आयोजित केल्याचे दिसून येत होते. दरवषी मद्याचा महापूर आणि जल्लोषी वातावरण राहत होते. मात्र यावषी ते प्रमाण कमी असल्याचे दिसून आले. कोरोनामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना यापुढे तरी असे वर्ष लाभू नये, अशा प्रतिक्रिया देत सारेजण निरोप देत होते. अनेकांनी घरी राहूनच सरत्या वर्षाला निरोप दिला आहे.