प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या नाचणे श्रीरामनगर येथे चेरटय़ाने घरातील 27 हजार किंमतीचे दागिने लांबवल्याचा प्रकार समोर आला आह़े ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडल़ी या प्रकरणी सचिन पद्माकर चवंडे (47, ऱा नाचणे रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आह़े
चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये 25 हजार किंमतीची सोन्याची चैन व 2 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्याचे रिंग आदींचा समावेश आह़े पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी आपल्या राहत्या घराच्या बेडरूमध्ये दागिने ठेवले होत़े सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घराचा मागील दरवाजा उघडा होत़ा या दरवाजावाटे चोरटय़ाने घरामध्ये प्रवेश करून बेडरूममधील दागिने लांबवल़े या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्टेबल चव्हाण करत आहेत़