चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत
अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाचे नाव घूमर असून यात अभिषेन एक क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. तर सैयामी एक क्रिकेपटूच्या भूमिकेत दिसून येईल.

अभिषेक आणि सैयामी यांनी यापूर्वी ब्रीद या वेबसीरिजच्या दुसऱया सीझनमध्ये एकत्र काम केले होते. सैयामी महाराष्ट्राच्या राज्य स्तरीय क्रिकेट संघाची सदस्य राहिली होती. तसेच तिने राष्ट्रीय संघातही स्थान मिळविले होते. परंतु त्यानंतर तिने क्रिकेटऐवजी बॅडमिंटनचा पर्याय निवडला होता. त्यामुळे सैयामीला ही व्यक्तिरेखा साकारणे तुलनेत सोपे जाणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. घूमर या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. बाल्की हे करत आहेत.
सैयामी याचबरोबर ताहिरा कश्यपच्या शर्माजी की बेटी या चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच अश्विनी अय्यर यांच्या फाडू चित्रपटात ती काम करत आहे. हायवे या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत झळकणार आहे.